Friday, 2 September 2016

जून 2014 ते एप्रिल 2015 च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मी राबविलेला एक लक्षणिय उपक्रम-

संस्कृत विषय हा तसा क्लिष्टच आहे असे बरेच जणांचे म्हणणे असते. त्यातही संस्कृत व्याकरण तर बहुतांशी मुलांचा नावडता भाग असतो. सतत शब्द पाठ करणे,हृस्व दीर्घ, कारकार्थ, विभक्ती, अपेक्षित विभक्ती धातू त्यांची रुपे लक्षात ठेवणे. सर्व कांही अत्यंत विद्यार्थ्यांच्या नावडीचे असते. त्यातही बरेचदा व्याकरण शिकवताना कथन पध्दतच वापरली जाते. कथन पद्धतीमुळे कोणत्याच प्रकारची रंजकता निर्माण होत नाही.
      मग विचार केला की, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण जर अध्यापन केले तर त्यांचे अध्ययन आनंददायी होईल. पण सध्या मुलांमुलींचा आवडता मित्र कोण असेल ? तर Computer त्याचाच वापर करावयाच ठरवला.
      संस्कृत विषयाच्या बाबतीत अजूनही एक महत्वाचे म्हणजे इतर सर्व विषयांच्या बाबतीत तयार साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. इंग्लीश, सायन्स, मॅथ्स साठी Self Learning CD's उपलब्ध आहेत. नवनित सारख्या कंपन्यांनी सर्व वषयांसाठी रंजक, रंगीबेरंगी 1 ते 12 वी पर्यंतच्या CD's  काढलेल्या आहेत. पण संस्कृतसाठी असे काहीच कोणी बनविलेले नाही. म्हणून यावर्षी हा नविन प्रयोग करायचा ठरविला. हे Presentation वयोगट लक्षात घेऊन बनविले आणि वेगवेगळ्या वर्गांवर त्याची उपयोगिता पडताळण्याचे नियोजन केले.  
      इयत्ता 8 वी व 9 वी चे वर्ग यासाठी ठरविले आणि वाक्यरचना सुलभ करण्यासाठी Presentation च्या माध्यमातून Slides बनविल्या त्या पुढील प्रमाणे-
          यातही आवश्यक सर्व सूचना, शब्द दिले.
      या सर्व P.P.T. ना चित्रमय बनविले. विशेषण-विशेष्या प्रमाणे जोड्यांचे नमुने दाखविले. कर्त्याचा -क्रियापदावरही परिणाम देखील बालचित्रातून दाखविले. अपेक्षित विभक्तींचे रंगीत तक्ते बनविले. कारकार्थाचे तक्ते व उदाहरणे दिली. सोप्याकडून अवघडाकडे अशा Slides ची रचना केली. क्रमाक्रमाने शेवटूनच थोड्या आधीच्या slide मध्ये तर क्लिकवर कर्ता बदलतो अशी योजना केली. विशेषण-विशेष्य जोडी किंवा सर्वनाम-विशेष्य जोड्या, एकवचन-बहुवचन या P.P.T. मध्ये सुद्धा animation चे effects दिले. त्यामुळे रंजकता आली. त्याला background ला संस्कृत गाण्याची साथ दिली.
      आता वरील सर्व slides ICT च्या रुममध्ये सर्व computer वर लोड केल्या. आमच्या शाळेत 12 computer आहेत. त्यावर 12 x 3 विद्यार्थींनी बसतात. म्हणजे 36 मुली एकाचवेळी या संचाचा वापर करु लागल्या. असा हा स्वयंअध्ययन संच तयार झाला.
      त्यामुळे विद्यार्थिनी कोणतीही slide कधीही ओपन करुन वाचू शकत होत्या आणि हे सर्व चित्रमय असल्याने त्यांना ते फारच रंजक वाटले.


फायदे - विद्यार्थिनी स्वतःच्या वेळेत अध्ययन करु लागल्या.
रंजकता वाढली.
Slides परत परत बघू लागल्या.
सतत श्रवण एवढेच काम न राहता दृक्-श्राव्य,कृति सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळाले.
Slides मध्ये प्रश्न सोडविण्यासाठी दिले असल्याने तीन तीन विद्यार्थिंनींचे गट तयार झाले व गटचर्चा सुरु झाली.
अनेक शंका निर्माण होऊ लागल्या.
मी त्यांना सतत उपलब्ध होतेच त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली.
मुळापासून व्याकरण आवडू लागले. ज्ञानरचनावादानुसार अध्ययन प्रक्रिया स्वपरिचयाकडे गेली.
      या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की विद्यार्थिनींच्य़ात विश्वास निर्माण झाला की, संस्कृत आपल्याला येईल, छोटी छोटी वाक्ये आपली आपण बनवू शकतो. मग याचाच फायदा मुलींना पण झाला आणि मलाही झाला. कारण मुलींच्या मागण्या वाढू लागल्या, बाई आम्हाला बनविण्यासाठी आणि वाक्ये द्या.
      या 'वाक्यरचना' सुलभतेने आता मुलींचे निबंधसुध्दा स्वरचित होऊ लागले. बरेच शब्द मला सुध्दा माहित नव्हते ते शोधावे लागले.अशा प्रकारे वर्गात चैतन्य निर्माण झाले. बाह्यभाषांतरासाठी विद्यार्थिनिंना वाक्यरचना शिकल्याचा फायदा होऊ लागला. मराठी वाक्यांचे संस्कृतात भाषांतर करा हा प्रश्न त्यांना सोपा जाऊ लागला.त्यामधील मग अशाच प्रकारे अनेक चित्रे व आवश्यक शब्द त्याखाली शब्दमंजुषेत लिहीले. अशा slides बनविल्या. मुलींना आता वाक्ये बनवायचा नादच लागला. मग चट् तासाला त्या computer वर ठेवलेली चित्रे ओपन करुन चित्रांची वर्णने स्वतःच्या भाषेत करु लागल्या.
      या उपक्रमामुळे नक्कीच त्यांच्या शब्दसंग्रहात वाढ झाली. आत्मविश्वास वाढला.संस्कृतविषयी प्रेम निर्माण झाले.पूर्वीच्या कथन पध्दतीने विद्यार्थिनींचा प्रश्न सोडविण्याचा आलेख खालीलप्रमाणे (लाल) दिसून आला. तर निळ्या रंगाचा आलेख त्यांची प्रगती दाखवितो.
फलश्रुति -
निष्कर्ष -पूर्वी जे प्रश्न विद्यार्थिनी टाळत होत्या ते प्रश्न आता त्या आनंदाने सोडवू लागल्या. संस्कृतात उत्तरे, निबंध, उपपद-अव्ययांचा वापर हे प्रश्न पाठांतराने सोडवत होत्या ते आता समजून लिहू लागल्या. अशाप्रकारे
सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।। ही प्रक्रिया सुरु झाली.            




                                         सौ.माधुरी अभय कुलकर्णी 

No comments:

Post a Comment