स्त्री-पुरुष समानता की संपूरकता ? या निबंधाच्या िवषयाच्या वाक्यरचनेतच त्याचं उत्तर
सामावलेले आहे असे मला वाटते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की जसे ती नको नको
वाटते त्याप्रमाणे कदाचित जिते तिथे स्त्री-समानता आड येऊ लागल्याने या विषयावर
चर्चा करण्याची आज वेळ आली आहे. आपण एका थांब्यावरुन निघून भलत्याच थांब्याकडे
आपला मुक्काम वळवतोय असं काहीसं आपल होतयं का ? याकडे थोडसं अभ्यासपूर्ण नजरेनं पाहून चर्चा करुया.
भारतामध्ये किंबहुना एकूणच जागतिक
स्तरावर जर आपण समाजरचनेचा इतिहास बघू लागलो तर आपल्या असे लक्षात येते
की,कोणत्याही समाजाची मूळं ही स्त्री-पुरुष नात्यात घट्ट रुजत असतात. स्त्री किंवा
पुरुष दोघांपैकी एकाने समाज निर्मिती होत नाही. मी याठीकाणी जीवसृष्टी न म्हणता
मुद्दाम 'समाज' हा शब्द जाणून बुजुन वापरत आहे. जीवसृष्टी निर्माण
करणं ही संकल्पना सर्व सजीवांना लागू पडते तर संस्कारित,एकसंघ,एका ध्येयाने
पछाडलेला समूह म्हणजे समाज.मग अगदी भारताचाच यादृष्टिने विचार करायचा तर वैदिक
काळापासून स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे हक्क होते. तिला मान सन्मान होता. प्राचीनकाळी
स्त्रिया सर्व कार्यात पुरुषाच्या बरोबरीने तळपत होत्या, वेदातील अनेक मंत्रांच्या
रचयिता स्त्रिया होत्या. गार्गी,मैत्रयी, सुलभा, अरुंधती, आत्रेयी, अनसूया या
स्त्रिया बह्नवादीनी होत्या. स्त्रिया युध्दावर जात होत्या. दशरथाची राणी कैकयी
देवासुर संग्रामात दशरथाबरोबर रथावर बसून युध्दावर गेली. त्या युध्दात रथाचा आस
मोडला तर तिने त्याजागी आपला हात धरुन रथ सावरला. श्रीकृष्णाने जेंव्हा भौसासुराची
राजधानी प्रागज्योतिणपूर यावर स्वारी केली,तेंव्हा श्रीकृष्णाबरोबर गरुडावर बसून
सत्यभामा युध्दावर गेली. अर्जुनाची पत्नी सुभद्रा ही पळून जाताना अर्जुनाचे सारथ्य
करीत होती. सीता, तारा, मंदोदरी, द्रौपदी या स्त्रिया चतुर पण्डिता, धैर्यशील व
तेजस्वी होत्या. सीता, तिलोत्तमा इ. अनेक राजकन्यांना स्वतःचे विवाह स्वतः
ठरविण्याचे अधिकार होते.
वरील सर्व उदाहरणांचा मागोवा पहा.
स्त्री - पौराहित्य करणारी, वेद जाणणारी
स्त्री - लढवय्या रुपात संरक्षणदल.
स्त्री - चालक, सारथी रुपात.
स्त्री - पण्डिता / बुध्दिवादी
स्त्री - स्वतंत्र विचारांची, स्वयंवर रचू शकणारी.
म्हणजेच एवढ्या भूमिका पार
पाडणाऱ्या स्त्रीला खरोखरच समानतेचा दर्जा समाजाने दिलेला होता हे लक्षात येते. नंतर तिच्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेवून
पुरुषांनी समाजावर वर्चस्व स्थापन केले आणि पुरुषप्रधान समाजरचना अस्तित्वात आली.
साधारणपणे 1930-40 च्या सुमारास भारतात तर स्त्रीयांची अवस्था फारच बिकट होती.
स्त्री-पुरुष समानता नव्हती व संपूरकता तर त्याहून लांबची गोष्ट होती.
ताराबाई शिंदे आपल्या 1882
स्त्री-पुरुष तुलना पुस्तकात यासंदर्भात लिहीतात
"पुरुष स्त्रीला गृहीत धरुन वागवत
होता. स्त्री धर्म म्हणजे सतत नवरा व्यसनाधीन,शिव्या देणारा फितुर असला तरी
त्याच्या सेवेत हजर रहावे."
अशा अनेक स्त्रीयांनी आपले परखड
विचार स्पष्ट शब्दांत मांडण्यास सुरुवात केली. सर्व हक्कांपासून वंचित ठेवल्या
गेलेल्या स्त्रीला समाजात स्वतःची ओळख मिळू लागली.
1940 साली "स्त्री-जीवन विषयक काही प्रश्न"
या नावाने एक पुस्तक प्रकाशित
झाले. त्याच्या लेखिका होत्या सौ.कमलाबाई टिळक-M.A. या पुस्तकाची निर्मिती स्त्रीचा
बालविवाह,अशिक्षितपणा,बालविधवा या काळात झालेली आहे. स्त्री-मुक्तीचे वारे जोरात
वहात होते आणि याचवेळी कमलाबाई लिहितात ते विचार आपल्या या लेखाला गति देणारे आहेत
असे मला वाटते.
स्त्रियांची सामाजिक व राजकीय
हक्कांची मागणी समतेच्या तत्वावर आधारलेली आहे ..... सामान्य स्त्रियांना सध्याची
दोन्ही अतिशयोक्तीची टोके नापसंत आहेत. त्यांना दासी म्हटलेले खपणार नाही व राज्ञी
म्हटलेले रुचणार नाही. स्त्रिया या पुरुषाप्रमाणे एक साधासुध्या "मुष्यप्राणी" आहेत. एवढीच मनोमय खूण पुरुषाला पटवून देणे व या
तत्वाचे त्याला व्यवहारात आचरण करावयास लावणे, ही एवढीच
स्त्रीस्वातंत्र्यवादिनींची महत्वाकांक्षा आहे.
हे विचार खरोखरच प्रगल्भतेचे
द्योतक आहेत. यामध्ये कोणतीही टोकाची भूमिका दिसत नाही. सध्या 20 व्या शतकात
स्त्रीला समानतेचे सर्व हक्क प्रदान करण्यात आलेलेल आहेत. शासकीय आरक्षण इ.अनेक
संरक्षण विषयक कायदे तिच्या बाजूने करण्यात आले. यामुळे नक्कीच स्त्री-पुरुष
समानता निर्माण होत आहे. प्रगत अशा राज्यामध्ये स्त्री चांगली पदे ग्रहण करुन
न्यायाचे राज्य चालविण्यास प्रवृत्त होत आहे. पुढचा मुद्दा असा येतो की,
स्त्री-पुरुष समानतेने समाजात प्रगती झाली का ? तर हो नक्कीच.
मालविकाग्निमित्रम् या ठिकाणी
विदुषकाच्या तोंडी एक वाक्य आहे "स्त्रीया ह्या निसर्गतःच चाणाक्ष्य असतात"
मग हा चाणाक्ष्यपणा, व्यवहारात
समाजासाठी वापरण्याची तिला संधी मिळाली, आणि स्त्री ही जात्याच चिकट म्हणजे कामसू
असल्याने पडलेले काम हे ती अत्यंत चिकाटीने, प्रमाणिकपणे करते आहे. यावर्षीचा
लोकसेवा आयोगाचा जो निकाल लागला आहे त्यामध्ये पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावले
आहेत. एस.एस.सी.,एच.एस.सी. निकालात सुध्दा मुलींनीच बाजी मारली आहे. समाजासाठी असे
पोषक वातावरण निर्माण होत आहे. समानता निर्माण होत आहे.
आता समानतेचा विचार करताना याही
कांही गोष्टींचा थोडा उहापोह करावा असं मला नुकत्याच झालेल्या शालाबाह्य मुलांच्या
सर्वेक्षणातून लिहावं वाटत. सध्याच्या समाजात दोन स्तर निर्माण झालेले आहेत.
मध्यमवर्गीय खालचा वर्ग -अप्रगत
प्रगत आहे + (
आर्थिक ) दुर्बल
उच्चवर्गीय
(आर्थिक) सबल
मध्यमवर्ग आणि उच्चवर्ग
यांच्यादृष्टीने स्त्र-पुरुष समानता की संपूरकता याचा अर्थ वेगळा होईल तर आर्थिक
दृष्ट्या खालच्या सत्रात हा अर्थ अत्यंत वेगळा होईल. शाळाबाह्य मुलींच्या
पुर्नसर्वेक्षणाची जबाबदारी माझ्या शाळेची माझ्यावर होती. म्हणून कराडसारख्या शहरी
भागात असणाऱ्याझोपडपट्टीतून मुली गोळा करण्यासाठी मी व माझे सहकारी गेलो. 8 मुली
11 वर्षाच्या, 4 मुली 13 ते 14 वयोगटातील सापडल्या. यामधील त्यांची शाळेत न
येण्याची कारणे जेंव्हा जाणून घेतली तेंव्हा -इथे समानता अजून कशाशी खातात असे
विचारावे लागेल अशी अवस्था आहे.
11 वर्षाच्या मुली धुणी-भांड्याची
कामे करताहेत. वडील दारुडे,संध्याकाळी त्यांच्यासाठी पैसे दिले नाहीत तर कशानेही
(जळत्या लाकडानेही मार खावा लागतो)
13 वर्षाच्या 2 मुली तमाशामध्ये
नाचायला जातात. एकीच्या बापाने तिला एका 33 वर्षाच्या पुरुषाला देण्याचे कबूल केले
आहे.
या सर्वेक्षणातून डोकं सुन्न झालं
आणि माझ्या लेखाची दिशा बदलली. आपण या समाजात समानता आणणार की संपूरकता ? पहिल्यांदा याठिकाणी मगाशी उधृत केलेले कमलाबाई टिळकांचे विचार अंमलात
आणण्याची फार मोठी गरज वाटते. "स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणे मनुष्यप्राणी आहेत"
बरं ज्याठिकाणी स्त्रीया ह्या पोषक
वातावरणात आहेत त्याठीकाणी काय अवस्था आहे ? समानता याचा अर्थ काय ? याची मर्यादा
कोणती ? हे सुध्दा जाणून घेणे महत्वाचे आहे. तरच
स्त्री-पुरुष समानतेला अर्थ आहे.
पुरुष कुंकु लावतात का ? नाही मग आम्हीच
का लावायचे ? लावणार नाही-
अशा सममानतेच्या पोकळ कल्पना आपण मांडून भांडू लागलो तर स्त्री मुक्ती,स्त्री
अधिकार या सर्व प्रगतीच्या वाटा चुकीच्या दिशेने जावून थांबतील अशी काहीशी अवस्था
आज समाजात झाली आहे. समानतेचा भ्रामक अर्थ काढून समाजावर अनेक दुष्परिणाम होत
आहेत.
गेल्या आठवड्यात 'सकाळ' (सातारा टुडे) या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो.
'प्रशासकीय सेवा व संरक्षण दलातील
महिला अधिकाऱ्यांच्या मध्ये सर्वात जास्त आत्महत्येचे प्रमाण दिसून आले. हादरुन
टाकणारी ही अवस्था आहे कारण याचे स्पष्टीकरण पुढे असे होते की, शासकीय
जबाबदाऱ्या,घरातील जबाबदाऱ्या या सर्व पेलत असताना होणाऱ्या मानसीक/शारीरिक
कसरतीला/टेन्शनला वैतागून त्या आत्महत्त्येस प्रवृत्त होत आहेत.
केवढी भयानकता आहे समानतेत असा
क्षणभर विचार येतो. काही ठिकाणी अशी अवस्था आहे की आपल्या समानतेच्या हक्कासाठी
तरुण पिढी विनाकारण वितंडवाद घालत आहे. सध्या समाजात अशी ओरड आहे की अनेक तरुणांचे
विवाह होत नाहीत. मुली खूप शिकलेल्या आहेत, त्या आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर आहेत,
त्यांना आरक्षण आहे त्यामुळे त्यांच्याकडे अधिकाराची पदे आहेत. पण तरुणमात्र या
स्पर्धेत मागे आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा कमी शिकलेला कमी पॅकेज असणारा नवरा
स्वीकारण्याची मुलींची तयारी नाही. त्यामुळे समाजाची पुढील घडण धोक्यात येत आहे.
यातूनही लग्न जमलीच तर समानतेचा
हक्क सागणाऱ्या आमच्या कन्या घरातील सर्व कामांत वागण्यात समानता प्रस्थापित करु
इच्छितात.
माझ्याच वयाच्या (वय 38) एका
मैत्रीणीचे उदाहरण इथे सांगते. वयाच्या 29 व्या वर्षी लग्न झाले ती स्वतः खूप
हुशार,सुंदर, M.E.आहे. बऱ्याच अटींमधून तिने 'वर' वरला. संसार सुरु झाला. प्रथमतः
कुणी कुणाच्या Flat वर राहायचे हे ठरले. संसार सुरु झाल्याच्या पहिल्याच
दिवशी तिने अटी सांगितल्या.
"मी चहा केला की तू कपबश्या
विसळायच्या" या व अशा
अनेक......
रोज खटके उडू लागले कारण
प्रत्येकाला स्वाभिमान असतोच आणि महिन्याभरात Divorce
ची केस फाईल झाली. ही अतिशयोक्ती
नाही सत्य आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात भारतात एकूण 43000 घटस्फोटाच्या घटना
न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
More
reasons or causes in increasing divorce in India या आपल्या लेखात Dr.A.S.Karla
Astrologer लिहीतात
1. Women becoming financially
independent.
2. Interference of parents,misuse of
IPC 498A, Conspiracy against boy & his family.
ही काही घटस्फोटाची कारणे आहेत तर शेवटचे कारण अत्यंत विदारक आहे ते म्हणजे आई
वडिलांनी मुलींचे लग्न क्श्रीमंत/चांगल्या घराण्यात करुन द्यायचे व काहीही कारणे
काढून Divorce मागायचा.पोटगी मागायची. अनेक charges त्याच्या व घरच्यांवर लावून पैसे मागायचे. Divorce झाला की मुलींचे दुसऱ्या कुणाशीतरी
परत लग्न लावून हाच उद्योग करायचा. हा पैसे मिळविण्याचा सर्रास धंदा म्हणून
पालकांनी (मुलींकडून) सुरु केला आहे.
मग आपल्याला स्त्री-पुरुष
समानतेतून हे साधायचे आहे का ? याचे अनेक दुष्परिणाम समाजावर होत आहे. वरीलप्रमाणे
लग्न झाले, मुल झाले पण पालकांचा घटस्फोट झाला आहे अशी अनेक बालके सध्या समाजात
दिसताहेत. आई किंवा वडिल यांच्यापैकी एकाचेच प्रेम (कर्तव्य म्हणून कदाचित) त्याला
मिळत आहे. मग ही पिढी पुढच्या पिढीवर काय संस्कार करेल ? काहीवेळा अशा
मुलाची जबाबदारी मी का घेऊ अशी भूमिका आहे. मग ते मूल अनाथ आश्रमात (5 star) वाढत आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या भ्रामक कल्पनेतून स्त्रीयांमधील व्यसनांचे
प्रमाण देखील वाढत आहे.
पुरुषांना खूप टेन्शन्स असतात ते
मद्यपान करतात मग कधीतरी मी मद्यपान केले तर काय हरकत आहे ? आम्हाला
टेन्शन्स नाहीत का ? आणि यातून ती सवय लागत आहे. मग अशावेळी
बलात्काराच्या घटना-अत्याचार घडणार हे नक्कीच ाहे. शिवाय कुटुंबच जीथे अस्तित्वात
नाहीत त्याठिकाणी वृध्दांना कोण आधार देणार ? पण .... ? या पणच्या मागे
मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. समानता याचा अर्थ काय ? याची मर्यादा कोणती ? हे सर्वांनी
सजग माहित करुन घेतले,वर्तनात आणले तर स्त्री-पुरुष समानतेला अर्थ आहे.
थोडक्यात स्त्री-पुरुष समानता ही
आपण वरकरणी अंगी बाणत आहोत. शारीरीक, दृश्य स्वरुपातील समानते बरोबरच एकमेकांच्या
समजूतदार पणातील समानता आपल्याला विचारात घेतली पाहिजे. म्हणजेच समानतेबरोबरच
परस्पर सामंजस्य आवश्यक आहे आणि ते म्हणजेच संपूरकता.
मनुस्मृती मध्ये म्हटले आहे की,
द्विधा
कृत्वामृनो देहमर्धेन पुरुषोsभवत् ।
अर्धेन नारी तस्यां स विराजमसृजत्प्रभुः ।।
ब्रम्हदेवाच्या देहाचे दोन भाग
करुन एका भागास स्त्री व दुसर्या भागास पुरुष असे नाव देण्यात आले. यामध्ये
कोणताही कमीजास्तपणा नाही.
हे मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे
की, निसर्गाने स्त्रीला काही वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. स्त्रीला मातृत्वाची
मोठी देणगी दिली आहे आणि म्हणूनच तिचे शरीर कोमल बनविले आहे. भावनिकदृष्ट्या
तिच्याकडे मायाळूपणा जन्मतःच बहाल केला आहे म्हणून हे सर्व झूगारुन देण्यात आणि
स्वतःला सतत सिध्द करण्यात आपण का समानता दाखवावी.
आपल्या कतृत्वातून स्त्री जर सिध्द
झाली तर पुरुष आपोआपच तिच्या मदतीला धावून येतो. हे मी प्रत्यक्ष स्वानुभवातून
सांगत आहे. पुरुषाला सुध्दा भावना आहेत. बयको जर आपल्या कुटुंबासाठीच झगडत आहे तर
तिला पाठींबा देणे,कामात मदत करणे हे त्याने स्विकारले आहे. पण ज्याठीकाणी तुम्ही
सतत " मीपणा,समानता आणू लागता" तिथे नात्यात वितुष्ट निर्माण होते. प्रेमाने जग जिंकता येते. आपण चार पावले
मागे सरकलो तर पुरुष नक्कीच तुम्हाला पुढे येऊन मदतीचा हात देईल अन्यथा नात्यात
आलेले वितुष्ट परत जोडता येत नाही. इथं कबीरांचा एक दोहा मला आठवतो-
रहिमन धागा प्रेम का मत तोडो
चटकाय ।
टूटै सो फिर ना मिले, मिले
गाँठ पड जाय ।।
मग अशा प्रकारे न वागता नात्यात
सुंदरता आणून जीवन सुखी-समाधानी करणे हे आपल्याला स्त्री-पुरुष समानतेतून साधायचे
आहे की -- ?
खरे तर स्त्री-पुरुष हे अर्धनारीनटेश्वर
(शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं अपेक्षित आहे. स्त्री आणि पुरुष ही
कुटुंबाच्या रथाची चाकं आहेत. ती परस्पर पूरक एकाच दिशेत प्रस्थान करेल आणि
मुक्कामी पोहोचेल. या ठीकाणी मी असं म्हमत नाही की स्त्रीयांनी चूल मूल फक्त
सांभाळावं. स्वतःचा विकास-करियर करत असतानाच चांगली पिढी जन्माला घालून तिच्यावर
संस्कार करावेत. यासाठी नवरा व घरच्यांच्यात जर विश्वास निर्माण केला,आपली भूमिका
तिने समजावून दिली तर खरी 'स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल'.तुमच्या
कतृत्वाचा आदर करणारी,तुमचा सन्मान करणारी,प्रेमाने पाठीवरुन हात फिरवणारी,
शाबासकी देणारी माणसं तुम्ही परस्पर सामंजस्यानेच मिळवू शकता.
भांडणाने-वादाने-कायद्याचा धाक दाखवून मिळवू शकत नाही.
म्हणूनच मनुस्मृती प्रमाणे स्त्री
व पुरुष यांचा उत्तम धर्म थोडक्यात सांगता येईल.
"एकमेकांनी एकमेकांशी आमरण,धर्म
अर्थ व काम यामध्ये निष्कपट रीतीने वागणे, म्हणजे स्त्री-पुरुष समानते बरोबरच संपूरकता
होय."
आपल्या विचारांमध्ये, वर्तनामध्ये
इतकी जरब पाहिजे की पुरुषांबरोबर समान हक्क मागण्याची वेळ आपल्याला आली नाही
पाहिजे. शिवाय परस्परांना आधारभूत-आश्वासक मार्गदर्शक किंबहुना उपकारक अशी
स्त्री-पुरुष रुपे आहेत.
छ.शिवाजी महाराज आणि जिजाबाईंच्या नात्याचा
इथे उल्लेख आवर्जून करावा वाटतो. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे जिजाबाई या शिवाजी
महाराजांचे दैवत होत्या. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी शिवाजी महाराज
जिजाबाईंचा सल्ला घेत असत. ( मग याठिकाणी हे नाते समानतेचे ही होते व संपूरकतेचेही
होते ) याठिकाणी शालीनता, नम्रता, परस्पर विश्वास, आदर होता. दोघांपैकी कोणीच
कोणाचा स्पर्धक नव्हता,स्वतःच्या सुखासाठी झटणारा नव्हता तर 'स्वराज्य' हे त्यांचे
स्वप्न होते. हे नाते समानतेचे व संपूरकतेचे होते.
दुसरे उदाहरण यशवंतराव व
वेणूताईंचे घेता येईल. ज्यावेळी यशवंतरावांना पंडित नेहरुंनी दिल्लीला बोलवले व
संरक्षणमंत्री पद सोपवणार असल्याचे सांगितले तेंव्हा यशवंतरावांनी उत्तर दिले 'मी घरात
सल्लामसलत करतो आणि उद्या कळवितो' घरात त्यांना ही सल्लामसलत कोणाशी करायची
होता,परवानगी कोणाची घ्यायची होती तर वेणू(त्यांची पत्नी) ची.
पहा याला म्हणतात समानता व
संपूरकता.
ज्यावेळी माणूस उच्च ध्येयाने
झपाटून काम करतो त्यावेळी पोषाख,दिसणे,वागणे,आर्थिक स्वार्थ, कृत्रिमपणा, मागून
घेतलेला आदर या भावना छोट्या ठरतात. असंच आपलं काहीसं व्हा.ला लागलं आहे म्हणूनच
नको त्या गोष्टीत स्त्रिया समानता आणू पहात आहेत.
ताराबाई शिंदे - Stri Purush Samanta
( उच्चवर्णिय ब्राम्हण समाजातील विधवा स्त्रीच्या वर तिने तिच्यावर अत्याचार
करणाऱ्या नातेवाईकाचा खून केला. )
Stri Purush Tulana - हे article Pune Vaibhav मध्ये आलेल्या
(1881) च्या घटनेला उत्तर होते.
Stri purursh tulana (1882)
"
I'm just a poor woman without any real intelligence, who's been kept locked up
and confined ---- But everyday now we have to look at some new and more
horrible example of men who are really wicked, and their shameless lying
tricks, And people go about pinning the blame on women all the time.
Women
are smaller than men on average but when men and women
Indeed,
more women are drinking now than at any time in recent history,awarding to
health surveys. In the nine years between 1998 and 2007, the number of women
arrested for drunken driving rose 30%, while male arrests dropped more than 7%
between 1999 and 2008 the number of young women who showed up in emergency
rooms for being dangerously intoxicated rose by 52%. The rate for young men, though
higher,rose just 9%.
24% - College
age.
10% - 45
to 64
3% - 65
+
India
facts - 1667
cases of divorce were filed in Mumbai in 2014.
- 8347 in Kolkatta.
- 2000 in Lucknow
लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या
आत divorce चे प्रमाणे वरील प्रमाणे आहे.
ताराबाई शिंदे -
पुरुष स्त्रीला गृहीत धरुन
वागवत होता.
स्त्री धर्म म्हणजे काय ? तर निरंतर
पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारल्या,शिव्या
दिल्या, दुसऱ्या रांडा ठेवल्या,नवरोजी दारु पिऊन, जुगार खेळून कफल्लक होऊन,शंख
करीत,चोरी करुन,कोणाचा प्राण घेऊन,फितुर, चहाडी,खजिना लुटुन, लाच खाऊन जरी घरी आले
तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसे काही कृष्णमहाराज गौळ्याचे दहीदूध चोरुन,
चंद्रावळीला कलंक लावून आलेत ्से समजून परमान्यासारखी यांची मोठ्या हसतमुखाने
देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर रहावे हा स्त्री धर्म.
1940 साली स्त्री-जीवनविषयक कांही
प्रश्न या नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले. त्याच्या लेखिका होत्या सौ. कमलाबाई
टिळक - M.A. या पुस्तकाची निर्मिती लक्षात घ्या,स्वातंत्र्यपूर्व
काळात झाली आहे. ज्या काळात स्त्री म्हणजे पडद्याआडच होती. बालविवाह,
अशिक्षितपणा,बालविधवा अशा अनेक समस्यांनी ती ग्रस्त होती आणि स्त्री मुक्ती,
स्त्री स्वातंत्र्य चळवळ श्री. महर्षी कर्वे, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,
रानडे यांच्या विचारातून मूळ धरत होती. त्या परिस्थितीत लक्ष्मीबाई टिळक
स्त्री-स्वातंत्र्याबाबत लिहितात -
"स्त्रियांची सामाजिक व राजकिय
हक्कांची मागणी समतेच्या तत्वावर आधारलेली आहे ..... समान्य स्त्रियांना सध्याची
दोन्ही अतिशयोक्तीची टोंकें नापसंत आहेत. त्यांना दासी म्हटलेले खपणार नाही ल
राज्ञी म्हटलेले रुचणार नाही. स्त्रिया या पुरुषांप्रमाणेच एक साध्यासुध्या, 'मनुष्यप्राणी' आहेत, एवढीच
मनोमय खूण पुरुषाला पटवून देणे व या तत्वाचे त्याला व्यवहारात आचरण करावयास लावणे,
ही एवढीच स्त्री स्वातंत्र्यवादिनींची महत्वाकांक्षा आहे."
या विचारांचे सार सुध्दा हेच आहे.
स्त्रीला समान वागणूक त्या दोघांच्या परस्पर सामंजस्यातून समाज-कुटुंब बहरु दे.
स्त्री-पुरुष समानता की संपूरकता ? खरं तर
निबंधाच्या या विषयाच्या वाक्यरचनेतच त्याचं उत्तर सामावलेल आहे असे मला वाटते.
जसं स्त्रीला रक्षण हवे की आरक्षण ? यामध्ये रक्षण पण आवश्यक आहे आणि आरक्षण ही हवं आहे.
तसाच समांतर हा विषय आहे. स्त्रीयांना समान वागणूकपण हवी आहे आणि परस्पर नाते
संपूरकतेचेही हवे आहे.
सौ. माधुरी अभय कुलकर्णी
No comments:
Post a Comment