मला लिखाणाची फार उर्मी. आमच्या शिक्षण मंडळाची प्रतिवर्षी दोन सत्रात “ प्रबोधन
पत्रिका” प्रकाशित होते. त्यात दर्जेदार,निवडक
शैक्षणिक लेख असतात. त्यामध्ये मी खूप
वेळा लिखाण केले, ते छापले
गेले,पण अजुन नवीन कुठेतरी आपण लिखाण केले पाहिजे असं वाटत होते. आमच्या शाळेत गेले २० वर्षे महाराष्ट्र भारतीय शिक्षण हे मासिक येते
, मी त्याची नियमीत वाचक आहे. सहज १३-१४ चे
मासिकातील ‘राज्यस्तरीय
शैक्षणिक स्पर्धा’ हे परिपत्रक वाचले. त्यात
कै.ज.ग.उपाख्य नाना
भावे स्मृती स्पर्धा निवेदन दिसले,विषय आवडीचा होतो उपक्रम लिहून
पाठवा (फलश्रुती महत्वाची). हे वाक्यच मला फार आवडले.
मी उपकृम केलेले होते पण लिहून पाठवले नव्हते पण नुकतीच तारीख संपली होती तरीपण
केलेला उपकृम सांगण्याची खुमखुमी फार होती. मी मासिकावरील मोबाईल
क्रमांकावर फोन करायचा ठरवला,पाहू तरी विनंती करून असे वाटले
त्यातला ओळखीचा क्रमांक होता तो म्हणजे मा.पेठे सरांचा.
आता ओळखीचा असे मी मुद्दाम म्हणतेय म्हणजे सरांची आणि माझी ओळख मासिकातीलच..
कारण ‘गुरुवाणी’ हे सदर वाचण्यासाठी
मी अत्यंत आतुर असायचे. आमच्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका
(माझ्या शिक्षिका) सतत मला सांगायच्या मा.
मधुकर पेठे सरांचे विचार वाचत जा आणि मग मला ती सवयच लागली.मी या अप्रत्यक्ष ओळखीच्या जोरावर सरांना फोन केला. मी
मानसिकता केली होती की आता उत्तर मिळणार तारीख संपलीय, तुम्ही
पुढील वर्षी लवकर मासिक पहा,पण असं काहीच झालं नाही उलट सरांनी
विचारले,’लेख लिहिला आहे का? मी म्हटले
कच्चा तयार आहे.मग व्यवस्थित पूर्ण करून् ताबडतोब पाठवा.
तसा फोन आमच्या कार्यालयात करा. पण कार्यालयात
माझा फोन लागू शकला नाही. मला सरांना परत फोन करणं योग्य वाटतं
नव्हतं पण मझ्याकडं दुसरा पर्यायही नव्हता.. मी सरांना फोन केला
आणि परत फोन का केला म्हणून ते मझ्यावर चिडले नाहीत उलट मी बाहेरगावी आहे पण तुमचा
विषय कोणता आहे, हे त्यानी विचारले विषय संस्कृत म्हटल्यावर सरांना
बरे वाटले. तुम्ही लिहा मी कार्यालयात सांगेन अशी त्यांनी जबाबदारी
घेतली.
खरचं सरांच्या त्या बोलण्यानं माझं नातं या
मासिकाशी पक्कं झालं. माणसं सरांनी कशी तयार केली, आणि जोडली असतील
याचा अंदाज आला. अप्रत्यक्ष सरांच्या विचारांची मी अनुयायी बनले.अध्यापकांनी लिहतं व्हावं-लिहीत असताना अनेक् संदर्भ
वाचले जातात आपोआपच् अध्यापनात हे विचार रूजवले जातात ,अध्यापक
प्रयोगशील बनतात, घडतात,पर्यायाने ते चांगले
विद्यार्थी घडवतील. चांगले अध्यापकच चांगला देश घडवतील.
हाच सरांचा या सर्व खटाटोपाचा उद्देश असणार.सरांचा
हा अप्रत्यक्श् प्रेरणादायी सहवास मला खुप काही शिकवून गेला. गतवर्षीच्या पारितोषिक वितरणास आम्ही सरांना भेटण्याच्या ओढीने कराडहून आलो
पण त्याच वेळी सरगेल्याची दुःखद घटना समजली फार वाईट वाटले. पण
सराचे विचार पुढे नेणे ही त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल. आणि सरांच्या
विचारांतून साकारलेल्या या मासिकाच्या देखिल संपर्कात नक्कीच राहू. धन्यवाद…
माधुरी अभय कुलकर्णी
No comments:
Post a Comment