Friday, 2 September 2016

सांस्कृतिक कार्यक्रमातुन व्यक्तिमत्व विकास

      नृत्य-नाट्य-संगीत हा मनुष्याच्या जीवनाचा अनन्यसाधारण भाग आहे. मानवाच्या जीवनातून कला जर दूर केली तर ते निरस होऊन जाईल. जीवनात रोजच्या धकाधकीतून बाहेर पडायचे असेल तर या अभिजात कलाच मनुष्याला तारक ठरतात. म्हणुनच एक सुभाषितकार म्हणतो.
                  काव्यशास्रविनोदेन कालो गच्छति धिमताम्।
                  व्यसनेन मूर्खाणां निद्रया कलहेन वा
      बुध्दिमान माणसाचा वेळ हा काव्य-विज्ञान-करमणुक यांच्या आनंदग्रहणात जातो. तर मूर्खांचा वेळ हा वाईट गोष्टींची संगत,झोप,नाहीतर भांडणात जातो.म्हणजेच आपल्या जीवनात कलेचे महत्वाचे स्थान आहे. या कलेची योग्य जाण आपण विद्यार्थ्यांच्यात लहानपणातच निर्माण केली पाहिजे.चांगलं बघणं, चांगलं वागणं, चांगलं लिहिणं, आणि मग चांगलं व्यक्त करणं आपण मुलांच्यात रुजवलं पाहिजे. असे लिहिण्यामागं अनेक विचारांचा संघर्ष मनामध्ये आहे. सध्या दूरदर्शनवर अनेक वाहिन्यांवर लहानमुलांच्या नृत्य-संगीत-नाट्य यावर आधारित कार्यक्रम-स्पर्धा सुरू आहेत. त्यामध्ये मुलांच्या वयानुरुप कोठेही गाण्याची निवड नसते. पोषाख चित्रविचित्र आपल्या संस्कृतीला धरून नसतात.त्या मुलांकडून करवून घेतलेले अंगविक्षेप बीभत्स / लाजिरवाणे असतात. आणि याचेच लहानस्वरूप म्हणजे शाळाशाळांमधून होणारे विविधगुणदर्शनचे कार्यक्रम. महाविद्यालयांमध्ये देखिल ही परिस्थिती अजुनच भयंकर आहे.
      आमची शाळा ही मुलींची आहेआणि मला असं वाटतं की घरातील स्त्री (मुलगी) जर सुस्कांरीत असेल  तर ती संपूर्ण कुटुंब व्यवस्था पर्यायाने समाजव्यवस्था सुरळीत व पर्यायाने आनंदीपणे चालवू शकेल. मग यासाठी आमच्या शाळेत विविधगुणदर्शन या वार्षिक उत्सवाचे स्वरुप बदलवून टाकले. आमच्या या उपक्रमाची प्रथमतः आम्ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे निश्चित केली.
१)      विद्यार्थ्यांच्यातील कलेचा शोध घेणे.
२)      तिच्या आवडत्या कलेचा परिपोष होईल त्या कलाप्रकारात तिचा सहभाग घेणे.
३)      योग्य ते बदल तिच्यात उपचारातून घडवून आणणे.
४)      तिच्यातील कलेचा आविष्कार करण्यास मदत करणे.

मग वरील उद्दिष्टानुरूप कार्यवाही सुरु केली.
१)      प्रथमतः आमचे सांस्कृतिक मंडळ आम्ही स्थापन केले. यामध्ये संगीत-नृत्य-नाट्य-नेपथ्य-निवेदन असे विभाग बनविले. विभाग बनवून झाल्यावर विभागाची सभा घेतली जाते.निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन , सी.डी. बघणे , ऐकणे विविध व्याख्याने ऐकणे असा कार्यक्रम आमच्या विभागाचा सुरु होतो.
यासाठी एप्रिल-मे पासुन जुलै पर्यन्त आम्ही सतत एकमेकांशी चर्चा करतो.मुख्याध्यापक , अधिकारी हे देखील चर्चेत सहभागी होतात. आमच्या अनेक माजी विद्यार्थिनी की ज्या पूर्वी या मंडळात होत्या त्या देखील विविध विषय सूचवतात. मग सर्वजण मिळून जुलै दरम्यान विषय ठरवितो. त्याला अनुसरुन विषयाचे सूत्र ठरविले जाते.
उदा. कान्हा (कृष्णजीवनावरील नृत्य नाट्य संगीतमय आविष्कार) असा जर विषय घेतला तर यामध्ये गाणी कोणती असावीत, बाललीलेपासुन मोठ्या कृष्णापर्यन्त कसे कथानक घ्यावे, कोणत्या गाण्यांना नृत्य दाखविता येईल , कोणत्या संगीताच्या भागावर (मुझिक पिस ) नाट्य बसविता येईल हे ठरविले जाते. शिवाय यासाठी आवश्यक निवेदन जोडावे लागते,या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. काही ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर देखील करावा लागतो. हे सर्व प्रथम ठरवले जाते.
२)      मग विषयानुरुप प्रथम संगीत विभागाचे शिक्षक संगीताची जाण असणारया विद्यार्थिनींची निवड करतात. मग त्यांच्यावर संगीताचे संस्कार केले जातात. त्यांच्याकडून ओंकार साधना . करवून घेतली जाते.या मुलींमधून वैयक्तिक गाणी म्हणू शकणारय विद्यार्थिनींची समूहात साथ देणे , गाणी म्हणणे या साठीच्या मुलींची निवड केली जाते. मग गाण्यांचे वाटप केले जाते.प्रत्येक गाणे त्या विद्यार्थिनीला खूप वेळा ऐकायला लावले जाते. त्याचा सराव घरी करण्यास आम्ही त्याची सी.डी. पण त्यांना करून देतो. चट् तासांना, संगीताच्या तासाला शाळा सुरू होण्यापूर्वी, सुटल्यावर या विद्यार्थिनींना दररोज अत्यंत निष्ठेने , आनंदाने गाण्यांचा सराव संगीत कक्षात करतात.
*आमच्या कार्यक्रमातील गाण्याची निवड ही विद्यार्थिनींच्या वयानुरुप संस्कारक्षम अशीच असते. कोणत्याही रेडीमेड रेकाँर्डस् चा वापर केला जात नाही. पेटी-तबला,साईड रिदम्, सिंथ, आँक्टोपँड् . चा प्रत्यक्ष (लाईव्ह) वापर केला जातो.*
) आमचा कार्यक्रम हा वी ते १० वी या वयोगटासाठी आहे. त्यामुळे याचे भान ठेऊन ,
त्यांच्या   बैठकीचा (स्टँमिना) बघून ते .३० तासाची कार्यक्रमाची आखणी केली जाते. १६ ते १७ गाण्यांचा समावेश असतो. यामध्ये वैयक्तिक गीते, समूह गीते , शास्त्रीय गीते, हिंदी गीते, मराठी गीते, संस्कृत गीते, कन्नड गीतांचा समावेश आम्ही करतो.
) नुसता गीतांचा कार्यक्रम या वयोगटासाठी कंटाळवाणा ठरेल म्हणून यातील गीतांच्या जोडीला नृत्याविष्कार केला जातो. शास्त्रीय नृत्य शिकणारया (कथ्थक्,भरतनाट्यम्) विद्यार्थिनी,पाश्चिमात्य नृत्य कणार् या ,अंगातच लय असणार् या आणि हौशी कलाकार सर्वांचे वेगवेगळे गट बनविले जातात.
त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींच्यात नाट्य अभिनयकला अत्यंत चांगली असते. अशा विद्यार्थिनी वेगळ्या केल्या जातात. त्याचप्रमाणे या सगळ्यांत महत्वाची गोष्ट ठरते ती व्यक्तिरेखेसाठी विशिष्ठ पात्रांचा शोध. कार्यक्रमाचा विषय ठरल्यावर त्यात एकूण किती व कोणकोणती पात्रे आपल्याला लागणार आहेत हे आम्ही ठरवितो. आणि मग कलामंडळ सदस्य (शिक्षक) सतत व्यक्तिरेखांच्या शोधात राहतात.
उदाहरणार्थ पाहूयाकृष्ण- अत्यंत लोभस-गोंड्स-देखणं-बोलके डोळे-खोडकरपणा असणारं लाडीक व्यक्तिमत्व अशी विद्यार्थिनी शोधली जाते. मग कार्यकमात लहानपणीचा कृष्ण,पेंद्याशी खेळतानाचा थोडा मोठा कृष्ण, राधेबरोबरचा कृष्ण अशा तीन व्यक्तिरेखा लागणार असतील तर साधारण दिसायला जवळपास साम्य असणार् या ५ वी ,७ वी, ९ वी अशा वयोगटातील विद्यार्थिनी शोधल्या जातात. भूमिका वाटप करून समजाऊन दिल्या जातात.
नंतर सप्टेंबर आँक्टोंबर मध्ये मुलींचे गट बनवून त्यांना कार्यक्रमातील गाणी वाटून दिली जातात. शास्रीय नृत्यासाठी आमच्या माजी विद्यार्थिनींची-पालकांची पण आम्ही मदत घेतो. शाळेत नृत्य-नाट्य विभागाची जबाबदारी माझ्यावर असते. शाळेच्या मुख्याध्यापिका व अधिकारी वर्ग आमच्या पाठीशी असल्याने आम्हाला तासांची जुळणी करून देतात. मग नृत्य-नाट्य-संगीत असा एकत्र सराव चालू होतो. जवळजवळ २ ते ३ महिने आम्ही या कार्यक्रमासाठी झटत असतो. प्रत्येक गाण्यावरचे नृत्य-नाट्य अत्यंत बारकाईने बसविले जाते. कोणताही भडकपणा-हालचालींमध्ये,हावभाव करताना किंवा पोषाख करताना येणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेते.
३)      कार्यक्रमातील एकएक गाणे परिपूर्ण करून त्याबरोबर निवेदनासहीत सरावाला आता सुरूवात होते. कारण कार्यक्रमातील मुलीला हे माहीत असावे लागते, की कोणत्या निवेदनानंतर आपल्याला रंगमंचावर प्रवेश घ्यायचा आहे. शिवाय निवेदनाच्या तेवढ्याच वेळात त्यांना आवश्यक साधनसामुग्रीची व्यवस्था त्यांची त्यांची त्यांनाच करायची आहे, कारण एकदा कार्यक्रम सूरू झाला की आम्ही कोणीही शिक्षक स्टेजवर प्रवेश करत नाही. मग यामध्ये एकाच गाण्यात ९वी-१०वी-५वी च्या मुली एकत्र काम करत असतात अर्थातच मोठ्या ताई छोट्यांना सांभाळून प्रसंगी पोषाख-मेकअप बदलून प्रवेश करण्यास मदत करतात. निवेदन लिखाणाचे काम देखिल शाळेतील शिक्षकच करतात.
४)      शाळेतील चित्रकला शिक्षक व कार्यानुभव शिक्षक कार्यक्रमातील मुलीच्या मदतीने नेपथ्य बनवितात.कार्यक्रमात १०० ते १५० विद्यार्थिनींचा सहभाग असल्याने मेक अपपोषाख,
५)      शिवाय प्रत्येक गाणे-प्रसंगानुरूप पोषाख बदल असल्याने शाळेतील् प्रत्येक घटकाची आम्हांला मदत घ्यावी लागते. पालकांचे सहकार्य तर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.
आणि या कार्यक्रमाच्या वेळी आमची स्थिती अशी असते
विश्वासाने एकत्वाच्या मार्गावर करीता चाल।
६)      इतक्या सगळ्या कलाकारांसाठी खुप मोठ्या व भक्कम स्टेजची आवश्यकता असते,ही गरज ओळखून संस्थेच्या पदाधिकार् यांनी आम्हाला अत्यंत भक्कम व प्रशस्त स्टेज बांधून दिले आहे.                               
७)      आता या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे आम्ही नृत्य-नाट्य-संगीत-वक्तृत्व यामध्ये शिक्षण झालेल्याच तरबेज मुलीचिच् निवड करतो का? किंवा ज्यांचे पालक आवश्यक गोष्टी आर्थिक किंवा इतर कारणाने पुरवू शकत नाहीत त्यांना घेतो का?
तर आम्ही या कार्यक्रमामध्ये ज्यांना भाग घेण्याची इच्छा आहे त्या सर्व विद्यार्थिनींची निवड यामध्ये आम्ही करतो. कारण आमचा हा कार्यक्रम कोणताही प्रोफेशनल स्टेज शो नसतो.त्या तोडीचा आम्ही तो बसवतो पण आमचा मुख्य हेतु विद्यार्थिनींचा निखळ आनंद हाच असतो.
भले एखाद्या विद्यार्थिनीला अभिनय करायचा आहे पण मुळात त्यातील काही येत नाही,मग तिला मुख्य भूमिका दिली जात नाही पण तिला स्टेज वर येण्याची संधी दिली जाते. त्यामुळे शाळेतील सर्व मुलींना हा कार्यक्रम आपला वाटतो.त्यामुळे अनेक स्वयंसेवक आम्हाला मिळतात. शिवाय आर्थिक मदत ज्या मुलीना हवी असते त्या साठी आम्ही शिक्षक कल्याणनिधी गोळा करतो.

 गेले १० वर्षे आमची प्रशाला असे कार्यक्रम बसवत आहे व सादर करत आहे. त्यातील काही विषयांचा उहापोह खालील प्रमाणे
) किलबिलाटबालगीतांवर आधारित कार्यक्रम.
) ऋतुगंध भारतीय सण त्यांचे सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक महत्व.
) वन्दे मातरम्। - देशभक्तीपर गीते-प्रसंग यावर आधारित कार्यक्रम.
)सा-रे---विविध बालगीते भक्तीगीते भावगीते यांवर आधारित कार्यक्रम.
) कान्हाकृष्णाच्या बाललीलांपासुन अनेक लीलांवर प्रकाश टाकणार उदबोधन पर कार्यक्रम.
) मोरयागणपति-गजानन बुद्धिची देवता तिच्या अनेक रूपांविषयी माहिती देणारा कर्यक्रम
) निसर्गायणपर्यावरण वाचवा आणि निसर्ग या विषयावर आधारीत कार्यक्रम.
) बोलावा विठ्ठलमहाराष्ट्राचे दैवत असणारा पांडुरंग. त्याच्या दर्शनासाठी आतुर वारकरी.वारी भक्तीने ओथंबलेला सोहळा.
) राजा शिवछत्रपति शिवछत्रपतिंच्या कार्याचा महान आदर्श विद्यार्थांपुढे ठेवण्यासाठी हा भव्य उत्सव.
१०) तेजोमय नादब्रह्म हे आमच्या प्रशालेचे अमृत महोत्सवी वर्ष होते.त्यामुळे आमच्या १० वर्षातील कार्यक्रमाचा आढावा आम्ही या कार्यक्रमात घेतला. शिवाय आमच्या माजी विद्यार्थिनींचा सहभाग देखील यात होता
अशा विविध विषयांवर मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रम आमच्या प्रशालेने सादर केले आहेत. या कार्यक्रमांसाठी आम्हाला संस्थेचे सचिव, शिक्षणतज्ज्ञ कै. प्रभुणे सरांनी प्रेरणा दिली. शिक्षण मंडळ कराड या संस्थेचे सर्व पदाधिकारी नेहमीच आमच्या पाठीशी असतात. या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ प्रशालेच्या अत्यंत सृजनशील मुख्याध्यापिका परांडकर बाईंनी रोवली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक वेळा आमच्या या कार्यक्रमांना कराडचे आदरणीय माजी खासदार व सध्याचे सिक्किमचे राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील या कार्यक्रमांना उपस्थित असत, व प्रत्येकवेळी आम्हाला त्यांच्या कौतुकाची थाप मिळे.

आता या कार्यक्रमाचे शालेय जीवनातील महत्व व कार्यक्रमातून झालेली फलनिष्पत्ती पाहूया
१1)      अनेक विद्यार्थिनीना स्टेज मिळते.
२2)      विद्यार्थिनींमधील सुप्त गुण त्यांना समजतात. व शिक्षकांना विद्यार्थिनींमधील सुप्त गुण कळतात.
३3)      समूह नृत्य-गीत गायनामुळे कलेबद्दलची स्टेज बद्दलची भीड चेपते व सभाधीटपणा येतो.
४4)      समृद्ध वारशाची जाणीव विद्यार्थिनींना होते.
५5)      अंगविक्षेपभावना उद्दीपित करणारे प्रसंग-पोषाख-भडकपणा हे म्हणजेच करमणूक हे समीकरण बदलून क्लासिकल् बघण्याची ऐकण्याची सवय लागते.
६6)      भावनिक परिवर्तनाच्या काळात शारीरिक ,मानसिक उर्मीला योग्य काम मिळते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करण्यास मदत होते.
७7)      खुप पात्रांना परत परत स्टेजवर यावे लागत असते,पोषाख,रंगभूषा (मेक-उप)करावी लागत असते.यामुळे परस्पर मदत-संवादाची सवय होते. वेळेच्या नियोजनाची सवय लागते.
८8)      विषय निवड,विद्यर्थिनींची निवड निवेदन लिखाण यासाठी सांस्कृतिक मंडळातील शिक्षकांच्यात
विचारांची देवाण-घेवाण वाढते.
९9)      विद्यार्थिनी शिक्षक यांच्यातील अंतर कमी होते.
१10)  त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला कार्यक्रमासाठी वेळ द्यायचा आहे असे विद्यार्थिनींच्या लक्षात
येते तेव्हा अभ्यासासाठीचा वेळ अतिशय योग्य प्रकारे वापरतात.(क्वालिटी टाईम फाँर स्टडी)
१11  संगीत आणि नृत्य यामुळे एकाग्रता वाढते.
१12  गेल्या १० वर्षात आमच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींच्या गुणांचा रेशो काढला तर तो आम्हाला वाढलेलाच दिसला आहे.
असे अनेक फायदे आम्हाला या कार्यक्रमामधुन पहावयास मिळाले आहेत.आमच्या गावात  या कार्यक्रमांविषयी प्रतिवर्षी अत्यंत उत्सुकता वाढलेली आम्हांला दिसते. ही आमच्या साठी जणु शाबासकीच असते.
      दूरदर्शनच्या सर्व चँनेल्सवर, मोबाईलवर, इंटरनेटवर जे काही पहावयास विद्यार्थांना मिळते ते या पिढीसाठी अत्यंत घातक आहे. मी व माझे सुख मग ते कोणत्याही मार्गे मिळवा. असे दाखवले जातेय. नितीमत्तेचा विसर पडतोय. मग यामध्ये शिक्षक म्हणून आपली भूमिका महत्वाची ठरते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संस्कारांची शिदोरी मुलांना आपणच दिली पाहीजे म्हणूनच या संस्कारक्षम कार्यक्रमाचा खटाटोप्.

सौ. माधुरी अभय कुलकर्णी

No comments:

Post a Comment